🕒 1 min read
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने IPL 2025 चा 18 वा हंगाम आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ( IPL 2025 Suspended for a Week Amid India-Pakistan Tension ) हा निर्णय सर्व फ्रँचायझी आणि भागीदारांसोबत चर्चा करून घेण्यात आला आहे. पुढील वेळापत्रक आणि सामन्यांच्या आयोजनाबाबत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
धर्मशालामधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आला होता. मात्र बीसीसीआयने अधिकृतरित्या वीज पुरवठा आणि तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले होते. खेळाडूंना धर्मशालाहून दिल्लीत आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
IPL 2025 गुणतालिका: अंतिम फेरीत कोण?
आतापर्यंत IPL 2025 मध्ये 58 सामने पार पडले असून, 12 लीग सामने, प्लेऑफ आणि फायनल बाकी आहेत. गुणतालिकेत गुजरात टायटन्स आघाडीवर असून, त्यांच्यापाठोपाठ आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्याकडेही 16 गुण आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे 14 गुण आहे. पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला आहे. नेट रनरेटमुळे मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारतावर 400 ड्रोन हल्ला, पाकिस्ताननं तुर्कीचे ड्रोन वापरले; धार्मिक स्थळेही लक्ष्य
- लाहोरमध्ये भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणा नष्ट केली
- मोठा पलटवार! भारताचे पाकिस्तानवर 50 ड्रोन हल्ले, लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now