🕒 1 min read
भारताच्या हद्दीत घुसखोरी करत पाकिस्ताननं 400 ड्रोनच्या सहाय्याने 36 ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांसाठी तुर्कीने बनवलेल्या ड्रोनचा वापर करण्यात आला होता. यावर भारताने ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या आक्रमक कारवायांचा पर्दाफाश केला. पाकने ख्रिश्चन शाळा आणि गुरुद्वारा या धार्मिक स्थळांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात ख्रिश्चन शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pakistan Attacks India with 400 Turkish Drones, Targets Religious Sites, India Responds Strongly
पाकच्या सशस्त्र UAV ने भंटिडा सैन्य तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो भारतीय सेनेने निष्क्रिय केला. याशिवाय उरी, पुंछ, राजौरी, उधमपूरसारख्या संवेदनशील भागांमध्येही ड्रोन आणि गोळीबाराचे प्रयत्न झाले. यामध्ये काही भारतीय जवान जखमी झाले.
भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला करत चार ड्रोन पाठवले. याशिवाय पाकिस्तानच्या चार हवाई संरक्षण केंद्रांवर हल्ले झाले असून, त्यातील एक संपूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. पाकने भारतावर ड्रोन व मिसाईल हल्ले करत असतानाही नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत असल्याचा आरोपही भारताकडून करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाहोरमध्ये भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणा नष्ट केली
- मोठा पलटवार! भारताचे पाकिस्तानवर 50 ड्रोन हल्ले, लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त
- भारतावर पुन्हा हल्ल्याचा धोका, गुप्तचर यंत्रणांची माहिती उघड