Share

भारतावर पुन्हा हल्ल्याचा धोका, गुप्तचर यंत्रणांची माहिती उघड

India conducted ‘Operation Sindoor’ targeting 9 terror camps in PoK and Pakistan. Intelligence agencies reveal fresh threat of terror attack on India; details linked to recent Pahalgam massacre and Operation Sindoor response.

Published On: 

Intelligence agencies reveal fresh threat of terror attack on India; details linked to recent Pahalgam massacre and Operation Sindoor response.

🕒 1 min read

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत 9 प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले असून, या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ही कारवाई अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे झाली असून, भारतावर पुन्हा मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचे इनपुट गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाले होते, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईनंतर भारतीय लष्कराने एक महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स घेतली. या वेळी मागील दहशतवादी हल्ल्यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले, ज्यात पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक मारले गेल्याचेही स्पष्ट करण्यात आलं.

Operation Sindoor: India Strikes 9 Terror Camps in Pakistan

मिस्री म्हणाले की, पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता आणि यामध्ये दहशतवाद्यांनी कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडल्या. टीआरएफ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून ती लष्कर-ए-तोयबाशी संलग्न आहे. पाकिस्तानने या हल्ल्यांनंतर कुठलीही कारवाई न करता भारतालाच दोष दिला. अशा परिस्थितीत भारताने संयम न गमावता नियोजित आणि टप्प्याटप्प्याने उत्तर दिलं.

या कारवाईमागे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतात अतिरेकी घुसखोरीवर रोख लावणे, असंही मिस्री यांनी स्पष्ट केलं. त्यांनी साजिद मीरच्या प्रकरणाचाही उल्लेख केला, ज्याला पाकिस्तानने मृत घोषित केलं होतं. पण आंतरराष्ट्रीय दबावाखाली तो जिवंत असल्याचं समोर आलं, यावरून पाकिस्तानची भूमिका काय आहे, हे जगजाहीर झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.

Terror Threat Looms Over India Again, Intel Inputs Reveal Alarming Details

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!