🕒 1 min read
मुंबई | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राइकवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दहशतवादी हल्ल्याला युद्ध उत्तर नाही. ( War is not the answer to terrorism says Raj Thackeray ) अतिरेक्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जी पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील”, असं ते म्हणाले. त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत सांगितलं की, “तो देश आधीच बरबाद झालेला आहे.”
राज ठाकरे यांनी हल्ल्यानंतर सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा. दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे फिरतात, तिथे सुरक्षा का नव्हती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Operation Sindoor Not the Answer to Terrorism, Says Raj Thackeray
“सरकारने गंभीरतेने भूमिका घेण्याची गरज होती. अशा वेळी पंतप्रधान सौदी अरेबिया दौऱ्यावर, बिहार प्रचारात, केरळ उद्घाटनात, मुंबईत वेव्ह समिटमध्ये दिसले. हे कार्यक्रम टाळले जाऊ शकले असते,” असंही त्यांनी नमूद केलं.
ते पुढे म्हणाले, “आज नाक्यांवर ड्रग्स मिळत आहेत, त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करणे जास्त महत्त्वाचं आहे.” राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ९ दहशतवादी अड्ड्यांवर टार्गेटेड हल्ले, लष्कर-ए-तैयबाचे म्होरके ठार
- ऑपरेशन सिंदूरवर ट्रम्प यांची प्रतिक्रिया म्हणाले, “हे दु:खद आहे, शतकांपासून भारत-पाक लढत आहेत”
- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतातील भिंबर गलीमध्ये तोफगोळ्यांचा मारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












