🕒 1 min read
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई केली. पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानातील एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर प्रतिहल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र भारताने आज सकाळपासून पाकिस्तानमधील 12 शहरांवर प्रत्युत्तरात्मक ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरु केली. आतापर्यंत तब्बल 50 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.
या हल्ल्यात लाहोरमधील पाकिस्तानची अत्यंत महत्त्वाची रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे, अशी माहिती भारताच्या संरक्षण विभागाने दिली. भारताच्या तीव्र कारवाईनंतर पाकिस्तानमधील स्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.
India drone Strikes: 50 Drone Attacks on Pakistan After Pahalgam Terror
दरम्यान, या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका सरकारने पाकिस्तानमधील आपल्या नागरिकांना तातडीने देश सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तान मधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा सल्ला अमेरिकेच्या दुतावासाकडून देण्यात आला आहे. यावरून परिसरात आणखी काही मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारतावर पुन्हा हल्ल्याचा धोका, गुप्तचर यंत्रणांची माहिती उघड
- दहशतवादी हल्ल्याला युद्ध उत्तर नाही; ऑपरेशन सिंदूरवरुन राज ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका
- ९ दहशतवादी अड्ड्यांवर टार्गेटेड हल्ले, लष्कर-ए-तैयबाचे म्होरके ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










