‘मला राजकारण कळतं, पण…’; रितेश देशमुख राजकारणात येणार का? रितेशचा मोठा खुलासा!

रितेश देशमुख राजकारणात येणार का? या प्रश्नावर स्वतः अभिनेत्यानेच उत्तर दिलं आहे. “राजकारण समजणं आणि ते करणं यात खूप फरक आहे,” असं म्हणत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Published On: 

Riteish Deshmukh Politics: राजकारणात येणार का? रितेशचा मोठा खुलासा!

विलासराव देशमुखांचा (Vilasrao Deshmukh) वारसा, घरात राजकारणाचं बाळकडू आणि दोन्ही भाऊ सक्रिय राजकारणात… मग रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ‘पॉलिटिक्स’च्या पीचवर बॅटिंग कधी करणार? हा प्रश्न महाराष्ट्राला नेहमिच पडतो. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून रितेशही खादी चढवणार का? या चर्चांना आता खुद्द रितेशनेच पूर्णविराम दिला आहे.

नुकतंच राहुल महाजनच्या पॉडकास्टमध्ये (Podcast) रितेशने हजेरी लावली होती. यावेळी त्याने राजकारणातील एन्ट्रीवर आपली रोखठोक भूमिका मांडली. रितेश म्हणाला, “लोकांचं माझ्यावर अभिनेता म्हणून प्रेम आहे, पण तेच प्रेम राजकारणात मिळेलच असं नाही. अनेक अभिनेते राजकारणात गेले, काहींनी चांगलं काम केलं, तर काही जिंकू शकले नाहीत. जनता हुशार आहे, त्यांना माहितीय कोणाला कुठे ठेवायचं.”

Riteish Deshmukh Statement on Politics

“राजकारण समजणं आणि करणं यात फरक आहे” राजकारणाबद्दलची आपली समज सांगताना रितेश म्हणाला, “मला राजकारण आवडतं का? तर हो! मला ते समजतंही. घरातच राजकीय वातावरण असल्याने वेगळं काही शिकावं लागलं नाही, ते आपोआपच रक्तात भिनलंय. पण राजकारण समजणं आणि प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.”

रितेशने स्पष्ट केलं की, राजकारणासाठी एका वेगळ्याच लेव्हलच्या ‘कमिटमेंट’ची (Commitment) गरज असते. सध्या अभिनयातच आपल्याला आनंद मिळतोय आणि तिथेच आपण खूश आहोत, असं सांगत त्याने राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चा सध्यातरी फेटाळून लावल्या आहेत. “घरी जेवताना आजही राजकारणावर चर्चा होते, भाऊ काय करतायत हे मी बघतोय, पण प्रॅक्टिकली या गोष्टी करणं खूप वेगळं आहे,” असं रितेशने प्रांजळपणे कबूल केलं. त्यामुळे ‘लय भारी’ फेम रितेश तुर्तास तरी पडद्यावरच लोकांचं मनोरंजन करणार, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही