Share

सोनं खरेदी करताय? थांबा! 1 तोळ्याचा भाव ऐकून फिरतील डोळे; चांदीनेही रेकॉर्ड मोडला!

सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले असून जळगावात 1 तोळ्याचा भाव 1 लाख 82 हजारांवर पोहोचला आहे. चांदीनेही 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.

Published On: 

Gold Rate: सोन्याचा भडका! 1 तोळ्याचा भाव 1.82 लाखांवर; चांदीही कडाडली

🕒 1 min read

जळगाव : सोनं घ्यायचा विचार करताय? मग जरा काळजावर दगड ठेवा. कारण सोन्याच्या दराने (Gold Rate Today) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘सोनं घेणं आता फक्त श्रीमंतांचंच काम राहिलंय का?’ असा प्रश्न पडावा, इतकी भयानक परिस्थिती सध्या बाजारात आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज जो भाव फुटलाय, तो ऐकून सर्वसामान्यांना नक्कीच घाम फुटेल.

जळगाव सराफा बाजारात एकाच दिवसात सोन्याने मोठी उडी घेतली आहे. विश्वास बसणार नाही, पण एका तोळ्यासाठी आता चक्क 1 लाख 82 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दीड लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर भाव कमी होईल, या आशेवर असलेल्या ग्राहकांचा भ्रमनिरास झालाय. नुसतं सोनंच नाही, तर चांदीनेही (Silver Rate) ग्राहकांना ‘जोर का झटका’ दिलाय. चांदीचा भाव प्रति किलो थेट 4 लाखांवर पोहोचलाय. म्हणजेच, चांदीचे पैंजण किंवा जोडवी घेणंही आता खिशाला चांगलंच महागात पडणार आहे.

Gold Rate Today

या ऐतिहासिक दरवाढीमागे जागतिक कारणं मोठी आहेत. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सर्वांचा ओढा सोन्याकडे वाढलाय. त्यातच अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि मध्यवर्ती बँकांनी सोन्याची साठवणूक वाढवल्याने दरात ही त्सुनामी आली आहे.

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, ही दरवाढ इथेच थांबणारी नाही. आगामी काळात सोनं लवकरच 2 लाखांचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता आहे. आज जळगावात त्याचे पडसाद उमटले असून, लग्नसराईच्या तोंडावर सर्वसामान्यांचे बजेट मात्र पूर्णपणे कोलमडलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या