🕒 1 min read
राजकारणातील ‘दादा’ माणूस असं अचानक एक्झिट घेईल, यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाहीये. अजित पवारांच्या (Ajit Pawar) जाण्याने फक्त राजकीय पक्षच नाही, तर अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. बारामतीत जनसागराच्या साक्षीनं त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दादांच्या आठवणींनी डोळे पाणावलेले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक मोठं आवाहन केलं आहे.
राष्ट्रवादीने चित्रपट व सांस्कृतिक विभागाने राज्यातील सर्व थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स (Multiplex) मालकांना एक विनंती केली आहे. अजितदादांच्या स्मृती प्रीत्यर्थ पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात यावी, असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलं आहे. अजितदादांचं कलाकारांशी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं पाहता ही विनंती महत्त्वाची मानली जात आहे.
Ajit Pawar Death
चित्रपट सुरू होण्यापूर्वी किंवा मध्यंतरात (Interval) दोन मिनिटांचे मौन पाळावे, श्रद्धांजलीची स्लाईड लावावी किंवा एखादा व्हिडिओ दाखवण्यात यावा, असे पर्याय सुचवण्यात आले आहेत. जेणेकरून रसिक प्रेक्षकांनाही आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहता येईल.
२८ जानेवारीचा तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदला गेला. बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर विमान कोसळून (Plane Crash) अजितदादांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं राज्यावर शोककळा पसरली आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
दरम्यान, सोशल मीडियावरही (Social Media) कलाकार व्यक्त होत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवीने अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून नेटकरीही आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- अरिजीतची सिंहची नवी इनिंग? गायकीला रामराम ठोकल्यानंतर आता ‘या’ क्षेत्रात उडवणार खळबळ!
- ‘पोरक्या सूरजनं कुणाकडं पाहावं?’; अजितदादांचं अंत्यदर्शन हुकलं, मग ‘बिग बॉस’ फेम सूरजने जे केलं, ते पाहून रडाल!
- Sanjay Raut यांचा भाजपवर हल्लाबोल; अजितदादांना ‘तीच खरी श्रद्धांजली’ म्हणत लगावला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












