Share

‘पोरक्या सूरजनं कुणाकडं पाहावं?’; अजितदादांचं अंत्यदर्शन हुकलं, मग ‘बिग बॉस’ फेम सूरजने जे केलं, ते पाहून रडाल!

अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी सूरज चव्हाण सर्वसामान्यांच्या रांगेत उभा होता, पण गर्दीमुळे त्याला दर्शन घेता आलं नाही. त्यानंतरचा त्याचा व्हिडीओ काळजाचा ठाव घेतोय.

Published On: 

Suraj Chavan Video: अजितदादांच्या चितेवर टेकवलं डोकं! सूरजची पोस्ट व्हायरल

रक्ताचं नातं नसलं तरी मनाचं नातं किती घट्ट असू शकतं, हे आज पुन्हा एकदा बारामतीत पाहायला मिळालं. सत्तेच्या आणि ग्लॅमरच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे असं म्हणतात, पण ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आज जे केलं, ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्या ‘दादां’नी त्याला हक्काचं घर दिलं, त्याच अजितदादांना (Ajit Pawar) शेवटचं डोळे भरून पाहण्याचं नशीब मात्र सूरजला लाभलं नाही.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आज जनसागराचा महापूर लोटला होता. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून लोक आले होते. याच गर्दीत एक चेहरा स्वतःची ओळख लपवून, तोंडाला रुमाल बांधून सर्वसामान्यांच्या रांगेत उभा होता. तो दुसरा तिसरा कुणी नसून ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण होता. सेलिब्रिटी असूनही तो व्हीआयपी एन्ट्रीने गेला नाही, तर सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तासनतास रांगेत उभा राहिला.

Suraj Chavan Video

जनसमुदाय एवढा प्रचंड होता की, रांग संपता संपत नव्हती. दादांचं पार्थिव जवळ येईपर्यंत अंत्यविधीची वेळ झाली होती आणि सूरजला आपल्या ‘बापा’समान नेत्याचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. अखेर हताश झालेल्या सूरजने थेट दादांच्या चितेवरच डोकं टेकवलं आणि तिथेच तो ढसाढसा रडला.

या प्रसंगानंतर सूरजने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सध्या काळीज पिळवटून टाकत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आई-वडिलांनंतर मी तुमच्यात आई-आप्पा पाहात होतो. तुम्ही मला सोडून गेलात. आता पोरक्या सूरजनं नेमकं कुणाकडे पाहावं? I MISS YOU DADA…”

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर अजितदादांनी सूरजला बारामतीतील मोढवे गावात घर बांधून दिले होते. त्यांच्यात एक वेगळा जिव्हाळा होता. आज तोच आधारवड कोसळल्याने सूरज पुन्हा एकदा पोरका झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install