🕒 1 min read
“तुम ही हो…” म्हणत करोडो हृदयांवर राज्य करणारा अरिजीत सिंह (Arijit Singh) अचानक माईक खाली ठेवेल, असा विचारही कुणी केला नसेल. पण, त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टने चाहत्यांना जबर धक्का दिलाय. आता चर्चा फक्त निवृत्तीची नाही, तर त्याच्या ‘दुसऱ्या इनिंग’ची आहे. सूर सोडून अरिजीत आता थेट राजकारणाच्या आखाड्यात (Politics) उतरणार का? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अरिजीतने पार्श्वगायनातून (Playback Singing) निवृत्ती घेतली खरी, पण तो स्वस्थ बसणारा नाही. अरिजीत चक्क स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील जियागंजमध्ये राहणारा हा साधा-भोळा गायक आता नेता बनण्याच्या मार्गावर आहे. मात्र, तो लगेचच 2026 ची बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असंही समजतंय. थेट मोठी उडी घेण्यापेक्षा तो तळागाळातील (Grassroot level) निवडणुकांवर लक्ष केंद्रित करू शकतो. अरिजीतचं साधं राहणीमान आणि समाजकार्य बघता, त्याचा हा निर्णय अनेकांसाठी अनपेक्षित असला तरी अशक्य वाटत नाहीये.
Arijit Singh Politics
या सगळ्या चर्चेची ठिणगी पडली ती अरिजीतच्या त्या इन्स्टाग्राम पोस्टने. त्याने स्पष्ट शब्दांत लिहिलंय, “मी प्लेबॅक गायक म्हणून आता कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही.” हे वाचून चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ‘चन्ना मेरेया’, ‘केसरिया’ आणि ‘तेरा यार हूँ मैं’ सारखी सुपरहिट गाणी देणारा आवाज आता नवीन गाण्यातून ऐकू येणार नाही, ही कल्पनाच चाहत्यांना सहन होत नाहीये. सोशल मीडियावर (Social Media) सध्या फक्त अरिजीतच्या या निर्णयाचीच चर्चा आहे.
गेल्या दशकभरात बॉलिवूडला (Bollywood) एकापेक्षा एक हिट गाणी देणाऱ्या अरिजीतने अचानक घेतलेला हा ‘ब्रेक’ सर्वांना चकीत करणारा आहे. आता तो खरोखरच खादीचे कपडे घालून जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरणार की हे फक्त हवेतले अंदाज आहेत, हे येणारा काळच सांगेल. पण एक नक्की, अरिजीतची ही ‘एक्झिट’ आणि ‘पोलिटिकल एन्ट्री’ची चर्चा सध्या बंगालपासून मुंबईपर्यंत गाजतेय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘पोरक्या सूरजनं कुणाकडं पाहावं?’; अजितदादांचं अंत्यदर्शन हुकलं, मग ‘बिग बॉस’ फेम सूरजने जे केलं, ते पाहून रडाल!
- Sanjay Raut यांचा भाजपवर हल्लाबोल; अजितदादांना ‘तीच खरी श्रद्धांजली’ म्हणत लगावला टोला
- ‘मी विष्णूचा 10 वा अवतार पाहिलाय…’; ममता कुलकर्णींच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ, गायीबद्दलही केलं मोठं विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











