‘बायकोनंही नवऱ्यावर आवाज चढवला पाहिजे…’; राणी मुखर्जीच्या ‘त्या’ सल्ल्याने नेटकरी भडकले!

राणी मुखर्जीने ‘मर्दानी 3’ च्या प्रमोशन दरम्यान महिलांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. “नवरा ओरडला तर तुम्हीही ओरडा”, या विधानावर नेटकरी भडकले आहेत.

Published On: 

Rani Mukerji Statement: नवऱ्यावर ओरडलंच पाहिजे? राणी ट्रोल!

पती-पत्नीच्या नात्यात समजूतदारपणा हवा की ‘जशास तसे’ उत्तर? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय आणि याला कारणीभूत ठरली आहे बॉलीवूडची ‘मर्दानी’ राणी मुखर्जी (Rani Mukerji). सध्या ती आपल्या आगामी ‘मर्दानी 3’ (Mardaani 3) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, या प्रमोशनच्या नादात तिने महिलांना असा काही सल्ला दिला की, नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे.

एका मुलाखतीत बोलताना राणीने घरातल्या संस्कारांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “जर नवरा बायकोवर ओरडत असेल, तर बायकोनेही गप्प न बसता नवऱ्यावर ओरडलंच पाहिजे.” तिच्या मते, वडिलांनी आईवर ओरडणं ही सामान्य गोष्ट नाही. जर मुलं हे पाहत असतील, तर त्यांना वाटतं की स्त्रियांना अशी वागणूक दिली तरी चालते. “आदराची सुरुवात ही घरातूनच व्हायला हवी. त्यामुळे वडिलांचा आवाज चढला तर आईनेही आवाज चढवलाच पाहिजे,” असं तिने ठामपणे सांगितलं.

Rani Mukerji Statement

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि वादाची ठिणगी पडली. राणीला वाटलं असेल की ती ‘समानते’चा संदेश देतेय, पण नेटकऱ्यांना तिचा हा ‘किंचाळण्याचा’ सल्ला अजिबात रुचलेला नाही. अनेक युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका संतप्त युजरने कमेंट केली, “राणीला वाटतंय ती मजेत बोलतेय, पण हा काय सल्ला झाला? दोन चुकीच्या गोष्टी मिळून एक बरोबर गोष्ट कधीच होत नाही.” तर दुसऱ्याने तिला सुनावलं, “प्रत्येक वेळी आरडाओरडा कशाला? आपण शांततेने एकमेकांशी का बोलू शकत नाही?” नात्यात आदर राखण्यासाठी भांडण वाढवणं हा उपाय नव्हे, असं म्हणत नेटकऱ्यांनी राणीच्या विचारांवर सडकून टीका केली आहे. एकीकडे ती स्त्री सक्षमीकरणाचा चेहरा मानली जाते, पण दुसरीकडे असा ‘अजब’ सल्ला दिल्याने ती सध्या ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही