Share

“पैसे कुठून आले? शिंदे-शाहांनी दिले का?” शिरसाटांच्या ६७ कोटींच्या प्रॉपर्टीवर राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!

Sanjay Raut questions how minister’s son bought ₹67 Cr hotel; alleges illegal auction and money trail mystery.

Published On: 

Sanjay Raut questions how minister’s son bought ₹67 Cr hotel; alleges illegal auction and money trail mystery.

छत्रपती संभाजीनगर- राज्यातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट हे कौटुंबिक वादामुळे चर्चेत आले. आता या प्रकरणाला विराम मिळाल्याचे दिसत असतानाच शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी आणखी एका मोठ्या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला आहे.

आज माध्यमांशी बोलताना राऊतांनी शिरसाटांच्या ६७ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभं केलं. ते म्हणाले, “हे कौटुंबिक वाद आमच्यासारख्या नेत्यांनी सोडवायचे नसतात, पण सिद्धांत शिरसाट यांचा प्रॉपर्टी व्यवहार हा गंभीर स्वरूपाचा आहे.”

Sanjay Raut Alleges Illegal ₹67 Cr Property Deal by Siddhant Shirsat

राऊतांच्या मते, संभाजीनगरमधील ‘वेदांत हॉटेल’ ही प्रॉपर्टी अत्यल्प दरात सिद्धांत शिरसाट यांच्याच नावावर करण्यात आली. ६७ कोटी रुपयांचा हा व्यवहार बेकायदेशीरपणे लिलाव करून केला गेला असा आरोप त्यांनी केला. त्यांनी सरकारवर आरोप केला की, “ही प्रॉपर्टी मिळावी म्हणून लिलाव प्रक्रियेत हेरफेर करण्यात आली, टेंडर भरताना इतर उमेदवारांना कमी बोली लावायला भाग पाडण्यात आलं.”

“सिद्धांत शिरसाट कडे प्रचंड पैसा येतोय कुठून? उद्योगात त्याचं कोणतं नाव नाही, मग पैसे कुठून आले? दलालीतून की टेंडरिंगमधून? एकनाथ शिंदे की अमित शाह यांनी पैसे दिले का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत म्हणाले, “पचास पचास खोके आले होते, त्याला ( संजय शिरसाट ) जास्त मिळाले का? ही प्रॉपर्टी खरं तर त्याच्या मूल्यापेक्षा खूप कमी दरात विकली गेली.” अंबादास दानवे यांनीही सरकारला या प्रकरणाबद्दल पत्र दिलं आहे. सत्ता मिळवून लुटीचा परवाना मिळवला का?” असा सवाल करत राऊतांनी सरकारवर आणि शिरसाट कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही