🕒 1 min read
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने महाजन यांनी त्यांना ‘निर्लज्जपणाचा कळस’ असे संबोधले.
महाजन म्हणाले, “अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा विषय आहे आणि अशा पद्धतीने वकिलांनी बोलावं, तिच्या चारित्र्यावर आरोप करावे, यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही.”
Girish Mahajan slams Vipul Dushing
वकील दुशिंग यांनी न्यायालयात सांगितले की, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि त्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी. या वक्तव्यावर महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, दुशिंग यांना लाज वाटायला हवी असे म्हटले.
या प्रकरणामुळे वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन वकिलांच्या वक्तव्याचा निषेध केला. “माझी मुलगी गेलीय… आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू. मी हात जोडून विनंती करतो.” या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “माझी मुलगी गेलीय… तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नको!” हात जोडून विनवणी, वडिलांना अश्रू अनावर
- “गटाराचं पाणी कोणी पीत नाही!” – संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना थेट टोला
- “घरगुती हिंसाचाराचं समर्थन?” वकील दुशींगची सनद रद्द करा! अंजली दमानिया आक्रमक