🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- हॉटेल विट्सच्या ( वेदांत ) लिलावावरून पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून आला आहे. शिवसेना (उबाठा गट) खासदार संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शिरसाट यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
शिरसाट म्हणाले, “हॉटेल विट्सच्या लिलावाची ही सातवी वेळ होती. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आहे. बोली लावताना डिपॉझिट भरले गेले. आता महिन्याभरात २५ टक्के रक्कम भरावी लागेल. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका, अधिकृत कागदपत्रं मागवा.”
Sanjay Shirsat Replies to Sanjay Raut on Hotel Auction Allegations
शिरसाट यांनी राऊतांवर टोला लगावत म्हटलं, “ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही, ते असे आरोप करतात.” तसेच, “टक्केवारीवाल्यांनी बदनामी करणे थांबवावे,” असा थेट इशारा दिला.
संजय राऊत यांनी संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर हॉटेल लिलावात गैरप्रकार केल्याचा आरोप केला होता. त्यावर आता शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत लिलाव प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “शिंदे आणि अजितदादा दोघंही संवादात कमजोर!” – फडणवीसांचा रोखठोक दावा
- ‘माझी औकात नाही, म्हणत कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना सुनावलं; राज्यात शो घेणार असल्याची घोषणा!
- कोणत्याही गुन्हेगाराला रस्त्यावर फिरू देणार नाही – संजय शिरसाट यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








