🕒 1 min read
नाशिक | प्रतिनिधी – ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणीत महिलांच्या समस्या ऐकल्या. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे.”
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली असली, तरी त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत महिलांच्या समस्या ऐकल्या. ग्रामीण भागातील बालविवाह, हुंडा प्रथा, लैंगिक शोषण, सायबर गुन्हे यांसारख्या अनेक समस्यांचा त्यांनी उल्लेख करत कायद्यांची अंमलबजावणी होण्याची गरज अधोरेखित केली.
Rupali Chakankar says women must follow up complaints
चाकणकर म्हणाल्या, “महिलांच्या बाजूने कडक कायदे आहेत, पण लोक त्यातून पळवाट काढतात. पोलिसांकडून जर दुर्लक्ष झालं, तर महिला आयोग आहे. आम्ही तक्रारींचं योग्य त्या पद्धतीने निवारण करू.”
वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “सामोपचाराने भूमिका घेणे, समेट घडवून आणणे ही आमची भूमिका आहे. पण पोलिसांकडून दिरंगाई झाली. याची चौकशी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. तर परिणय फुके यांच्या कुटुंबाबाबत आम्हाला माहिती नव्हती. आमच्याकडे तक्रार आली नाही” असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे विलिनीकरण थांबवलं… पण का? संजय राऊतांनी सांगितली ‘ती’ खरी कारणं!
- “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान!
- जयंत पाटील अडचणीत? पक्षातील युवा आमदारांनी शरद पवारांकडे दाखवली नाराजी!