🕒 1 min read
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अखेर आयपीएल 2025 मध्ये पुन्हा विजयी ट्रॅक पकडला आहे. बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी नाट्यमय विजय मिळवला.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ फक्त १९० धावांपर्यंत मजल मारू शकला. दिल्लीसाठी विपराज निगमने १९ चेंडूत तडाखेबाज ३८ धावा करत शेवटपर्यंत संघर्ष केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला आवश्यक साथ मिळाली नाही आणि दिल्लीचा सलग दुसरा पराभव झाला.
KKR Beats Delhi Capitals by 14 Runs in IPL 2025
दिल्लीच्या फलंदाजीत फाफ डु प्लेसी (६२ धावा) आणि कर्णधार अक्षर पटेल (४३ धावा) यांनी चांगला खेळ केला. कोलकातासाठी सुनील नारायणने ३ बळी घेत मोठी कामगिरी बजावली, तर वरुण चक्रवर्तीने २ आणि अरोरा, रसेल व अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
महत्वाच्या बातम्या
- राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; पीकविमा योजना सुधारित, ई-वाहनांसाठी टोल माफीसह ११ निर्णय
- ओबीसी आरक्षण वाद पेटणार? लक्ष्मण हाके यांचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल
- पहलगाम दहशतवादी हल्ला कुणाच्या इशाऱ्यावर? आदिल राजाचा धक्कादायक दावा