🕒 1 min read
पाकिस्तानचे पत्रकार आदिल राजा यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या मते, पहलगाम हल्ला पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून करण्यात आला होता.
आदिल राजा यांनी एका व्हिडिओद्वारे दावा केला की, असीम मुनीर यांना लष्करामध्ये आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळवा, यासाठी भारताविरुद्ध तणाव वाढवण्याचा हेतू होता आणि त्याचाच एक भाग म्हणून पहलगाम हल्ल्या करण्यात आला.
Adil Raja Claims Pahalgam Terror Attack Was Ordered by Pakistan Army Chief Asim Munir
विशेष म्हणजे, हल्ल्याच्या तीन दिवस आधी मुनीर यांनी एक भाषण दिले होते, ज्यात त्यांनी भारताविरोधात तीव्र टीका केली होती. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यासाठी असीम मुनीर जबाबदार असल्याचे, आदिल राजाचे म्हणणे आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणात पाकिस्तानची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आदिल राजांचे हे वक्तव्य या वादाला नवी दिशा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक निवृत्ती का घेतली? आर. अश्विनने उघड केलं खरं कारण
- अशोक सराफ यांचा दोन वर्षांचा ब्रेक – मनाविरुद्ध भूमिका नाकारण्याचा ठाम निर्णय
- कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ईडीची क्लीनचिट; 15 वर्षांनंतर न्याय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now