🕒 1 min read
मुंबई | 29 एप्रिल 2025:
मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनयाने अढळ स्थान मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. सिटकॉम ‘हम पांच’च्या यशानंतर कामाची रेलचेल असूनही त्यांनी तब्बल दोन वर्ष अभिनयातून ब्रेक घेतला. त्यामागचं कारण त्यांनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात ‘मी बहुरुपी’ या पुस्तकात उलगडलं आहे.
‘हम पांच’ नंतर मिळालेल्या बहुतेक ऑफर्स या सारख्याच भूमिकांसाठी होत्या. अभिनय क्षेत्रात कायम नव्याचा शोध घेणाऱ्या अशोक सराफ यांना हे स्वीकारणं योग्य वाटलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं – मनाविरुद्ध काम करण्यापेक्षा घरी बसणं पसंत आहे. अभिनय क्षेत्रात वैविध्यपूर्ण भूमिकांचा शोध घेणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.
Ashok Saraf Took a 2-Year Break After Hum Paanch
आपल्या आत्मचरित्रात अशोक सराफ यांनी सांगितले की, केवळ यशाच्या झोतात न जाता, त्यामागचा संघर्ष, मेहनत आणि तत्त्वनिष्ठा यांचा विचार करावा लागतो. त्यांनी अभिनयाची कोणतीही औपचारिक शाळा न घेता केवळ अनुभवातून आणि मेहनतीतून ही कारकीर्द घडवली. विविध चढउतारांमधून वाट काढत, अनुभवी कलाकारांकडून शिकत त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
महत्वाच्या बातम्या –
- अभिनेत्री नेहा मलिकच्या घरात चोरी, मोलकरीण फरार
- राजकारण्यांनी आमच्या वेदनांवर राजकारण करू नका; दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची विनंती
- वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक शतकावर सचिन, युवराज, शमी आणि युसुफ पठानकडून कौतुकाचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





