🕒 1 min read
मुंबई | 29 एप्रिल 2025:
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन (R Ashwin) याने काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझी पॉडकास्ट शोमध्ये माईक हसीशी संवाद साधताना या निर्णयामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे.
आर. अश्विनने सांगितलं की, त्याने निवृत्तीबाबत दोनदा गांभीर्याने विचार केला होता – एकदा 2023 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आणि एकदा इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर. त्याला वाटलं होतं की आपली 100 वी कसोटी ही शेवटची ठरावी, पण उत्तम फॉर्ममुळे तो निर्णय पुढे ढकलला गेला. “खेळाची मजा येत होती, पण मानसिक आणि शारीरिक थकवा वाढत होता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणं महत्वाचं वाटू लागलं,” असं अश्विन म्हणाला.
R Ashwin Reveals Why He Retired Abruptly During Australia Tour
चेन्नई कसोटीत केलेल्या अष्टपैलू कामगिरीनंतरही त्याने खेळ सुरू ठेवला. मात्र न्यूझीलंडविरुद्ध पराभव आणि ऑस्ट्रेलियातील अपेक्षाभंगानंतर त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय निश्चित केला. आता तो केवळ IPL मध्ये खेळत असून, त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्स या मोसमात अपयशी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- अशोक सराफ यांचा दोन वर्षांचा ब्रेक – मनाविरुद्ध भूमिका नाकारण्याचा ठाम निर्णय
- कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ईडीची क्लीनचिट; 15 वर्षांनंतर न्याय?
- अभिनेत्री नेहा मलिकच्या घरात चोरी, मोलकरीण फरार