🕒 1 min read
कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात गाजलेले सुरेश कलमाडी ( Suresh Kalmadi ) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 15 वर्षांनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास बंद करत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला.
2010 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सुरेश कलमाडी यांच्यासह तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत आणि इतरांवर मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप करण्यात आले होते.
विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी या प्रकरणाचा आढावा घेत, सीबीआयने आधीच भ्रष्टाचाराचा खटला बंद केल्याचे नमूद केले. त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे मनी लॉन्ड्रिंगचा तपास करून कोणतेही ठोस गुन्हेगारी पुरावे न आढळल्याने क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
Suresh Kalmadi Gets Clean Chit from ED in Commonwealth Games Corruption Case After 15 Years
सीबीआयच्या चौकशीनुसार, आयोजन समितीने (OC) गेम्स वर्कफोर्स सर्व्हिस (GWS) आणि गेम्स प्लॅनिंग, प्रोजेक्ट अँड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस (GPPRMS) या कंत्राटदारांना काम देताना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने कंत्राटे दिल्याचा आरोप होता. या व्यवहारामुळे समितीला अंदाजे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आरोप केले गेले होते.
मात्र, चौकशी दरम्यान आवश्यक पुरावे मिळाले नसल्याने सीबीआयने 2014 मध्येच क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, जो आता न्यायालयाने स्वीकारला आहे. कलमाडी यांचे राजकीय अस्तित्व संपल्यानंतर हा निर्णय आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेत्री नेहा मलिकच्या घरात चोरी, मोलकरीण फरार
- राजकारण्यांनी आमच्या वेदनांवर राजकारण करू नका; दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची विनंती
- वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक शतकावर सचिन, युवराज, शमी आणि युसुफ पठानकडून कौतुकाचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












