🕒 1 min read
IPL 2025 मध्ये साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या १४ व्या वर्षी धडाकेबाज कामगिरी करत क्रिकेटविश्वाला थक्क केले आहे. ३५ चेंडूत शानदार शतक ठोकत त्याने दिग्गज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. कोवळ्या वयात केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे लवकरच उघडतील, असा अंदाज क्रीडाप्रेमींनी वर्तवला आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी आयसीसीने वयाची मर्यादा ठरवलेली आहे. या नियमानुसार, खेळाडूचे वय किमान १५ वर्षे असणे गरजेचे आहे. सध्या वैभवचे वय १४ वर्षे असल्याने त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. २७ मार्च २०२६ रोजी तो १५ वर्षांचा होईल आणि त्यानंतरच त्याला अधिकृत संधी मिळू शकते.
ICC Rule Could Delay Vaibhav Suryawanshi Team India Debut
याशिवाय, बीसीसीआयने आयसीसीकडे विशेष परवानगीसाठी विनंती केल्यास वैभवला लवकर खेळण्याची संधी मिळू शकते. आयसीसी खेळाडूचा अनुभव, मानसिक तयारी आणि आरोग्याचा आढावा घेत निर्णय घेते.
सध्या टीम इंडियासाठी सर्वात कमी वयात पदार्पणाचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १६ वर्षे २०५ दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. वैभव सूर्यवंशीला लवकर संधी मिळाल्यास तो हा विक्रम मोडू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2025 | केकेआरचा दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी विजय
- राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; पीकविमा योजना सुधारित, ई-वाहनांसाठी टोल माफीसह ११ निर्णय
- ओबीसी आरक्षण वाद पेटणार? लक्ष्मण हाके यांचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now