🕒 1 min read
पंजाब किंग्जचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने आयपीएल 2025 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शानदार हॅटट्रिक साधत इतिहास रचला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चहलने आपल्या फिरकीच्या जादूने सर्वांची मने जिंकली.
चेन्नईच्या डावातील 19व्या ओव्हरमध्ये चहलने आपल्या कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक घेतली. या ओव्हरमध्ये चहलने महेंद्रसिंह धोनी, दीपक हुड्डा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना बाद करत एकाच ओव्हरमध्ये चार बळी मिळवले. विशेष म्हणजे चहल हा आयपीएल 2025 मध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
Yuzvendra Chahal Takes Hat-trick Against CSK in IPL 2025
चहलने आधी 21 धावा दिल्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं. धोनीला बाद केल्यानंतर त्याने हुड्डाला कॅच आऊट केलं, नंतर अंशुल कंबोजला बोल्ड केलं आणि शेवटी नूर अहमदला यष्टिचित करून हॅटट्रिक पूर्ण केली.
या शानदार कामगिरीनंतर चहल आयपीएलमध्ये पंजाबसाठी हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी सॅम करन (2019), अमित मिश्रा (2011) आणि युवराज सिंग (2009 मध्ये दोनदा) यांनी पंजाबसाठी हॅटट्रिक घेतली होती. चहलच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे पंजाब किंग्जच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
- कुलदीप यादवने रिंकू सिंगच्या कानाखाली मारल्याचा व्हिडीओ व्हायरल; KKR ने दिलं स्पष्टीकरण
- हिंदूंनी घरात तलवार आणि चाकू ठेवावे; आरएसएस नेत्याचे हिंदूंना आवाहन
- राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत; फसवणुकीच्या गुन्ह्यात ५४ जणांवर गुन्हा दाखल