Share

हिंदूंनी घरात तलवार आणि चाकू ठेवावे; आरएसएस नेत्याचे हिंदूंना आवाहन

RSS leader K. Prabhakar Bhat urges Hindus to keep swords and knives at home for self-defense following the Pahalgam terror attack.

Published On: 

RSS Leader Urges Hindus to Keep Swords and Knives at Home After Pahalgam Terror Attack

केरळ | जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) के. प्रभाकर भट यांनी हिंदूंना घरात स्वसंरक्षणासाठी तलवारी आणि चाकू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

केरळच्या कासारगोड जिल्ह्यात मंजेश्वर येथील वरकाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रभाकर भट यांनी हिंदूना म्हटले की, “प्रत्येक हिंदूच्या घरी तलवार असली पाहिजे. जर पहलगाम येथे हल्ल्याच्या वेळी तलवार दाखवली असती, तर ते पुरेसं झालं असतं.”

RSS Leader Urges Hindus to Keep Swords and Knives at Home After Pahalgam Terror Attack

ते पुढे म्हणाले, “महिलांनी त्यांच्या बॅगमध्ये नेहमी सहा इंचाचा चाकू ठेवायला हवा. असा चाकू ठेवण्यासाठी कोणत्याही परवाण्याची गरज नाही. जर संध्याकाळी बाहेर असताना हल्ल्याचा धोका निर्माण झाला तर हल्लेखोराकडे विनवणी करू नका, तर चाकू दाखवा, तो आपोआप पळून जाईल.”

भट यांनी भूतकाळातील हिंदू-मुस्लिम संघर्षाचा उल्लेख करत सांगितले की, “पूर्वी संघर्षाच्या वेळी हिंदू पळायचे, पण आता परिस्थिती बदलली आहे. प्रत्येकाने संघर्षासाठी सज्ज राहिले पाहिजे.” प्रभाकर भट यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही