Share

पाकिस्तानात आपत्कालीन संसदीय अधिवेशन, भारताविरोधात ठरावाची शक्यता

Pakistan has called an emergency parliamentary session on Monday, May 5, following heightened tensions with India after the Pahalgam terror attack that claimed 26 lives. President Asif Ali Zardari may move a resolution against India, while discussions on the Indus Waters Treaty cancellation are also expected.

Published On: 

Pakistan Emergency Parliament Session After Pahalgam Attack: India-Pakistan Tensions Soar

Pakistan Emergency Parliamentary Session | पाकिस्तानमधील राजकीय आणि सामरिक परिस्थिती चिघळली असून राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन सोमवारी, ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला असून याच पार्श्वभूमीवर हे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रपती झरदारी यांनी शनिवारी मध्यरात्री अचानक अधिवेशनाचे आदेश दिले. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, या अधिवेशनात भारताविरोधातील ठराव मांडला जाऊ शकतो. तसेच भारताने सिंधू जलकरार रद्द केल्याच्या निर्णयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून भारताविरोधातील अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाण्याची आणि संसदेतून त्याला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

Pakistan Emergency Parliament Session After Pahalgam Attack

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून हा हल्ला मागील काही वर्षांतील सर्वात मोठा मानला जात आहे. भारताने याची गंभीर दखल घेतली आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत बैठकांचा धडका सुरू आहे. भारताकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याचदरम्यान, काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि देश एकसंघ असल्याचा संदेश देण्यासाठी हे अधिवेशन गरजेचे असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भारत-पाकिस्तान संबंधांतील या नव्या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून आगामी काही तास अत्यंत निर्णायक ठरू शकतात.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही