Share

काश्मीरमध्ये नवा धोका: लष्कर, जैश आणि हमासची हातमिळवणी; भारतासाठी मोठा इशारा

Terror alliance in Kashmir: Lashkar-e-Taiba, Jaish-e-Mohammed join hands with Hamas for operations in PoK; intelligence reveals new threats for India after Pahalgam attack.

Published On: 

Terror alliance in Kashmir: Lashkar-e-Taiba, Jaish-e-Mohammed join hands with Hamas for operations in PoK; intelligence reveals new threats for India after Pahalgam attack.

🕒 1 min read

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात भीतीचे वातावरण असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास सक्रिय झाल्याची माहिती समोर आली असून, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी हमाससोबत हातमिळवणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ला आणि इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हमल्यामध्ये साम्य आढळून येत आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांमध्ये लष्करचा सैफुल्ला आणि जैशचा संस्थापक मसूद अझरचा भाऊ रऊफ असगर असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, सैफुल्लाने गेल्या वर्षी कतारच्या दोहा शहरात हमासच्या राजकीय ब्युरो प्रमुख खालिद मशालसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहितीही मिळत आहे.

Hamas Joins Hands with Lashkar and Jaish in Kashmir

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता नव्या पातळीवर दहशतवाद वाढवला जात असून, स्थानिक मदरसे बंद करून विद्यार्थ्यांना AK-47 वापरण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. माहितीनुसार, नीलम व्हॅली आणि सुधनोती परिसरात हा प्रकार सुरू आहे. पाक लष्कराचा कर्नल आसीफ खान यांच्या नेतृत्वात ही प्रक्रिया चालवली जात आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर विस्तृत चर्चा झाली आहे. अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर सरकार आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Crime India Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या