🕒 1 min read
जम्मू आणि काश्मीर : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक आणि राजकीय नाड्या आवळल्या आहेत.
भारताचे महत्त्वाचे निर्णय:
-
पाकिस्तानी जहाजांना प्रतिबंध:
भारताने डीजीएसकडून आदेश जारी करत पाकिस्तानचा झेंडा असलेल्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सुरक्षिततेच्या कारणांवर आधारित असल्याचं डीजीएसने स्पष्ट केलं. -
आयात-निर्यात बंद:
भारताने सर्व प्रकारच्या आयात आणि निर्यात बंद केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. -
टपाल सेवा बंद:
भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधित सर्व टपाल सेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच पाकिस्तानचे चॅनल आणि वेबसाईट्स बॅन करण्यात आले आहेत. -
पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द:
पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -
सिंधू जल करार स्थगित:
भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. पाकिस्तानच्या पाणी व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. -
हवाई हद्द बंद:
भारताने पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे.
या निर्णयांमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने घेतलेल्या या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मैत्री जुनी आहे, पण मी एकनाथ शिंदेंकडे काही मागत नाही – नाना पाटेकर
- अजित पवारांचे स्वप्न मुख्यमंत्रीपदाचेच; सुनील तटकरे म्हणाले, पुढची शपथ ही….!
- ‘लबाडांनो पाणी द्या!’ मोर्चात आदित्य ठाकरे उतरणार; पाणीटंचाई विरोधात एल्गार