Share

पाकिस्तानी लोकांनी भारतात मतदान केलं; आधार, रेशन कार्ड असल्याचा केला धक्कादायक दावा

After the Pahalgam terror attack, Pakistani nationals are leaving India; Osama claims possession of Aadhaar, ration card, and voter ID before crossing Attari border.

Published On: 

Pakistani leave India after Pahalgam attack

🕒 1 min read

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशभरातील विविध राज्यांमधून पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून मायदेशी परतत आहेत. २४ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल ७८६ पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून सीमा ओलांडली आहे.

भारत सोडताना एका पाकिस्तानी तरुण ओसामाने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अनेक धक्कादायक दावे केले. ओसामाने सांगितले की, तो २००८ साली भारतात आला होता आणि गेल्या १७ वर्षांपासून येथे राहत आहे. त्याने भारतातच दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेतले असून, त्याच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, “एकदा मी भारतात मतदानही केले आहे. भारतात माझे शिक्षण सुरू होते, पण आता ते अपूर्ण राहणार आहे.”

Pakistani citizens Leave India After Pahalgam Attack

ओसामाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना सांगितले की, हा हल्ला मानवतेला काळिमा फासणारा आहे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात लग्न करून आल्या आहेत आणि हे देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर इशारा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!