🕒 1 min read
मुंबई:
‘बिग बॉस मराठी’च्या विजेता सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) पदार्पणाचा सिनेमा ‘झापुक झुपूक’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाल करू शकलेला नाही. केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ निर्मित या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत फक्त ₹67 लाख रुपयांचीच कमाई केली आहे.
टीझर आणि ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण, प्रत्यक्षात चित्रपटगृहात मात्र गर्दी फारशी दिसली नाही. विशेषतः रविवारी म्हणजे विकेंडच्या अखेरीस कमाईत घट झाली, जे अपेक्षेविरोधी ठरले. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई ही कमीच आहे. ‘झापुक झुपूक’चं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन हे काही लाखांमध्येच आहे.
Suraj Chavan Bigg Boss effect was not seen at all in cinema: ‘Zhapuk Zhapuk’ revenue drops
पहिल्या दिवशीचे कलेक्शन हे 24 लाख, तसेच दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन हे सुद्धा 24 लाख आणि तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन हे 19 लाख असे सगळे मिळून तीन दिवसांचं कलेक्शन फक्त 67 लाख आहे.
सिनेमाबाबत सुरूवातीला उत्साह होता, कारण सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण, ‘झापुक झुपूक’च्या कमाईने या लोकप्रियतेचं रुपांतर तिकीट खिडकीवर होईलच असं नसतं, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
सध्या ‘झापुक झुपूक’च्या अधिकृत कलेक्शनबाबत चित्रपटाच्या टीमकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. मात्र, सॅकनिल्कनं दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या विकेंडमध्ये हा सिनेमा 1 कोटीचा टप्पाही गाठू शकलेला नाही.
महत्वाच्या बातम्या –
- डिंपल कपाडिया यांचं धक्कादायक वक्तव्य; नाना पाटेकरांना म्हटलं ‘घृणास्पद आणि नकारात्मक’!
- विकी कौशलच्या घराचे एका महिन्याचे भाडे किती? किंमत ऐकून धक्का बसेल
- जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका; ५ बडे नेते अजित पवारांच्या गटात होणार सामील!