Share

राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत; फसवणुकीच्या गुन्ह्यात ५४ जणांवर गुन्हा दाखल

Minister Radhakrishna Vikhe Patil faces trouble as an FIR is filed against him and 53 others in a Rs 9 crore scam linked to Pravara Sugar Factory.

Published On: 

Maharashtra Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil faces trouble as an FIR is filed against him and 53 others in a Rs 9 crore scam linked to Pravara Sugar Factory.

🕒 1 min read

अहमदनगर : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे ९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ही फसवणूक २००४-०५ आणि २००७ या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बेसल डोस वाटपाच्या कारणास्तव राष्ट्रीयकृत बँकेकडून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे न देता, या रकमेचा गैरवापर केला गेला आणि नंतर कर्जमाफीच्या माध्यमातून ते कर्ज माफ करून घेण्यात आले.

FIR Filed Against Radhakrishna Vikhe in Pravara Sugar Scam

ही तक्रार कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून, आठ आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तत्काळ कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचेही कोर्टाने सांगितले आहे.

कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली असून, राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही