Sanjay Raut | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. अशातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या योजनेबाबाबत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले, “दारूची दुकानं वाढवणार आहेत. ड्राय डे कमी करणार आहेत. शॉप आणि मॉलमधून दारू विकण्याचं प्रपोजल आलं आहे. काही राज्यात घरपोच दारू पोहोचवण्याची स्किम आणण्याचं चाललं आहे.” तसेच पूर्ण राज्याला दारूडे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप देखील संजय राऊतांनीं केला आहे. हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार असल्याची टीकाही त्यांनी केलीय .
महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांसारखा असा विचार करत असेल तर ते राज्याचं दुर्दैव आहे, असा निशाणाही राऊतांनी साधला. यशवंतराव चव्हाण, फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं अजितदादांनी बंद करायला पाहिजे” अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | “उदय सामंत एवढे हुशार आहेत, की…”, रिफायनरी प्रकल्पावरून दीपक केसरकर यांचा खोचक टोला
- Sanjay Raut | “बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे”, लाडक्या बहीण योजनेवरून संजय राऊतांची सडकून टीका
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटतात, पण अजित पवारांना भेटत नाहीत; भुजबळ भाजपच्या वाटेवर?