Karuna Munde । अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा मुंडे यांच्यासोबत झालेले लग्न अधिकृत नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांकडून कोर्टात करण्यात आला. यानंतर करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचा तुमच्याकडे पुरावे काय आहेत?, असा सवाल न्यायाधीशांकडून करुणा मुंडेंच्या वकिलांना विचारला.
“आम्ही सगळे पुरावे सादर करू. हे पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे,” अशी मागणी करुणा मुंडेंच्या वकीलांनी केली. यावर आता करुणा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यावेळी 2016 मध्ये धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात बदनामीची केस दाखल केली , त्यावेळी त्यांच्या याचिकेमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेले आहे 1998 मध्ये करुणा मुंडे यांच्यासोबत माझं लग्न झाले आहे,” असा दावा करुणा मुंडेंनी केला.
“2002 साली राजश्री मुंडे (Rajshree Munde) यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचे लग्न झाले असून आता ते म्हणतात की माझे करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न झाले नाही त्या माझ्या लिव इन पार्टनर आहेत. 1998 मध्ये लिव्ह इन सारख्या नावाचे नातं तरी देशात होतं का?,” असा सवाल करुणा मुंडे यांनी केला.
Dhananjay Munde, Karuna Munde on Alimony Case Hearing in Court
पुढे त्या म्हणाल्या की, “बँकेत आमचे जॉईंट अकाउंट असून एका पॉलिसीमध्ये पत्नी म्हणून माझे नाव आहे. वसीहतनामामध्ये माझे पत्नी म्हणून उल्लेख आहे. त्यावर त्यांची सही आहे. कोर्टात 5 एप्रिलला आम्ही पुरावे सादर करू आणि येथे आम्हाला न्याय मिळेल,” असे मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :