🕒 1 min read
Manoj Jarange Patil । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) तिन्ही आरोपींनी कबुली जबाब नोंदवले आहेत. आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे मान्य केले आहे.
तसेच संतोष देशमुख यांची गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुख यांनी पोलिसांनी त्यांना बराच वेळ पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, असा आरोप केला आहे. शिवराज देशमुख (Shivraj Deshmukh) यांनी दिलेल्या जबाबावरून पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यावर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलीस अधिकारी पाटील आणि महाजनला सहआरोपी करा. कायदा प्रामाणिकपणे पाळून ज्यांनी काम करायला हवे, त्यांनीच गुंडांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. अशा पोलिसांना फासावर लटकवलं पाहिजे,” अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
Manoj Jarange Patil on Waghya Statue Controversy
तसेच त्यांनी वाघ्या कुत्रा स्मारकावरून सुरू असलेल्या राज्यातील वादावर प्रतिक्रिया दिली. “राज्यात आता कुत्रा आणि मांजरीवरून जातीय तेढ निर्माण करायचे आहेत का? संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) एकाकी पडले असे, माध्यम म्हणत असतील तर ते कधीही एकाकी पडणार नाही,” असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- “मुले तुमची पण करुणा मुंडे आई कशा नाहीत?”; Dhananjay Munde यांना कोर्टाने फटकारले
- “….तर Santosh Deshmukh यांचा जीव वाचला असता,” जबाबातून धक्कादायक माहिती समोर
- “धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं,” Anjali Damania यांचा खळबळजनक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












