Rakhi Rules– रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. बहिणींची बाजारात राखी खरेदीची लगबग सुरू झाली असेल. पण, तुम्ही तुमच्या लाडक्या भावासाठी जी राखी निवडत आहात, ती शास्त्रानुसार योग्य आहे का? बाजारात आजकाल हजारो रुपयांच्या डिझायनर राख्या मिळतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, रक्षाबंधनात राखीच्या किंमतीपेक्षा तिच्यामागील भावना आणि पावित्र्य जास्त महत्त्वाचं असतं.
Raksha Bandhan 2026: शास्त्रानुसार नेमकी कशी असावी राखी?
बदलत्या काळानुसार राख्यांचे ट्रेंड्सही बदलले आहेत. पण शास्त्रात रक्षासूत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा केवळ एक धागा नसून, भावाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आणि रक्षणाचं वचन आहे.
धागा कोणता निवडावा?
लाल, पिवळा आणि पांढरा हे रंग अत्यंत शुभ मानले जातात. हे रंग थेट ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी जोडलेले आहेत. तिन्ही रंगांचा धागा नसेल, तर किमान लाल आणि पिवळ्या रंगाची राखी नक्की बांधा. अगदी साधा सुती धागा जरी श्रद्धेने बांधला, तरी त्याचं फळ मिळतं.
त्याशिवाय, चंदनाची राखी अतिशय शुभ मानली जाते. चंदन हे पावित्र्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. रुद्राक्ष (भगवान शिव) आणि तुळशीची (भगवान विष्णू) राखीही तुम्ही नक्कीच निवडू शकता. काही ठिकाणी सोन्या-चांदीची राखी बांधण्याचीही प्रथा आहे. सोन्याचा संबंध सूर्याशी आणि चांदीचा चंद्राशी जोडला जातो.
काय टाळावं?
राखी घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अशुद्ध किंवा प्राण्यांच्या चामड्यापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर असलेली राखी चुकूनही घेऊ नका. राखी कायम साधी, पवित्र आणि शुभ असावी.
थोडक्यात सांगायचं तर, तुमचा भाऊ तुमच्याकडे महागड्या राखीची नाही, तर तुमच्या प्रेमाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे दिखावा करण्यापेक्षा साधी पण श्रद्धेने भरलेली राखी निवडा. यंदाचे रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
📌 महत्वाच्या बातम्या
- साखरेच्या वाढत्या दराने चिंता वाढली; सिद्धेश्वर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी
- ‘भाजपला राजकीय निवृत्ती घ्यायला भाग पाडू’; ममता बॅनर्जींचा इशारा
- ‘एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा’; विजय वडेट्टीवारांची इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











