SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची सातत्याने सुरू असते. अशात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 11,409 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या 11,409 रिक्त जागा आहेत.
SSC मार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 02 फेब्रुवारी 2023 पासून ते 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
या पदांसाठी अर्ज करताना सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे. तर महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि अपंग व्यक्तींना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Travel Tips | भारतीय कला आणि संस्कृती बघायची असेल, तर फेब्रुवारी महिन्यात ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Satyajeet Tambe | “काँग्रेसने विचारपूस करायला हवी होती”; निलंबनाच्या कारवाईवर सत्यजित तांबेंची खंत
- Sajay Raut | “देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही”- संजय राऊत
- Auto Expo 2023 | अरेच्चा! नॅनोची धाकटी बहीण, ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिल्या सोलर कारचे अनावरण
- BJP | “प्रेम ब्रिम काही नसतं, फक्त अपोझिट सेक्सचं आकर्षण असतं”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य