Ajit Pawar | “सरकारला सत्तेची मस्ती आली आहे”; अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका 

Ajit Pawar | सांगली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटातच दोन गट पडले. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.

ते म्हणाले, “या सरकारचं काय चाल्लंय, छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात.” सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत. त्यांना लाज लज्जा शरम आहे का नाही?, असा संतप्त सवाल त्यांनी केलाय.

पुढे ते म्हणाले, “राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कंर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व 50 खोके सरकार ओके. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल.”

महत्वाच्या बातम्या :