Sikkim Travel Guide | सिक्कीमला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ जागांना नक्की द्या भेट

Sikkim Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: सिक्कीम हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. सध्याचे वातावरण सिक्कीमला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुम्हाला जीवनाच्या गजबजाटातून थोडा वेळ काढून शांत आणि स्वच्छ ठिकाणी जायचं  असेल, तर तुम्ही सिक्कीमला भेट देण्याचा विचार करू शकता. कारण संपूर्ण सिक्कीम अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर सिक्कीमला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या.

झुलूक

झुलूक हे गाव समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवर वसलेले आहे. हे गाव भारत आणि तिबेटच्या सीमेजवळ पूर्व सिक्कीममध्ये वसलेले आहे. हे एक सुंदर आणि शांत गाव आहे. या गावामध्ये तुम्हाला हिमालय पर्वतरांगेचे नयनरम्य दृश्य बघायला मिळतील. या गावाला पोहोचण्यासाठी गंगटोकपासून सुमारे तीन तासाचा प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान तुम्हाला हिमालयाचे सर्वोत्कृष्ट दृश्य बघायला मिळतील. विशेष म्हणजे या गावात एकही हॉटेल नाही. या ठिकाणी प्रवाशांची राहण्याची सोय स्थानिक लोकांच्या घरातच केली जाते. सिक्कीमचे लोक किती विनम्र आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.

त्सोमगो तलाव

त्सोमगो तलाव गंगटोकपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. हा तलाव भारतातील सर्वात उंच तलावांपैकी एक आहे. या ठिकाणावरून तुम्हाला निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघायला मिळतील. या तलावाच्या सभोवती बर्फाचे पर्वत आहे. या तलावाची खासियत म्हणजे जसा ऋतू बदलतो तसा या तलावाचा रंगही बदलतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये हा तलाव गोठून जातो. वसंत ऋतुमध्ये आकर्षक आणि रंगबिरंगी फुले तलावाचे सौंदर्य वाढवतात. त्यामुळे या महिन्यात सिक्कीमला भेट द्यायला गेल्यास, या तलावाला भेट द्यायला विसरू नका.

पेलिंग

गंगटोकपासून पेलिंग 140 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण घनदाट जंगलाने वेढलेले आहे. इथे तुम्हाला अनेक ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करता येतील. यामध्ये तुम्ही माउंटेन बाइकिंग, रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग इत्यादी गोष्टी करू शकतात. पेलिंग हे ठिकाण अतिशय सुंदर असून खूप शांत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्वोत्तम वेळ घालवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.