Share

Bhaskar Jadhav | “मुंबई महापालिकेनं ठेवलेल्या रकमेवर पंतप्रधान मोदी अन् फडणवीसांचा डोळा”; भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

🕒 1 min readBhaskar Jadhav | रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (दि. १९ जानेवारी) मुंबईतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर भास्कर जाधव (Bhaskar … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bhaskar Jadhav | रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (दि. १९ जानेवारी) मुंबईतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले, “मी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं. मुंबई महापालिकेच्या अकाउंटमध्ये फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम हाच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा गाभा होता.”

९९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही फिक्स डिपॉझिट आहे. गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुंबई महापालिकेनं ही रक्कम ठेवली आहे. त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतो, असा गंभीर आरोप भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे.

मुंबईचा विकास करणं हा विषय बाजूला राहिला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून मुंबईला काय देणार, याबाबत अवाक्षरही काढलं नाही, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले. अशा उच्चपदस्थ माणसानं अशी टीका करणं शोभत नाही, असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!