AJIT PAWAR | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; अजित पवार घेणार निर्णय

AJIT PAWAR | पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने आमदारकीची जागा रिक्त झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड पोटनिवडणूक जाहीर केली आहे. भाजपकडून लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप पैकी एकाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस देखील पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतण्याची तयारी करत असल्याचे पाहायाला मिळत आहे.

आज राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची पोटनिवडणुकी संदर्भात बैठक पार पडली. ही निवडणूक लढवण्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आग्रही आहेत. घड्याळ या पक्षाच्या चिन्हावर ही विधानसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पदाधिकारी भेटणार असून सविस्तर बोलणार आहेत.

“शहरात भाजपची ताकद वाढत कमी करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. पदाधिकारी निवडणूक लढवण्यावर ठाम असून याबाबत लवकरच अजित पवार यांची भेट घेणार आहेत”, असे अजित गव्हाणे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.