Sanjay Raut – देशाचे नेत्तृत्व करण्यास राहुल गांधी सक्षम; जनता त्यांना पंतप्रधान बनवेल – संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | जम्मू –  संजय राऊत ( Sanjay Raut )  शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कठुआमधून जाणाऱ्या भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra ) सामील झाले. राऊत म्हणाले की, देशातील वातावरण बदलत आहे आणि मी राहुल गांधींना आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो. त्याच्या समर्थनार्थ गर्दी जमत आहे आणि लोक त्यात सामील होत आहेत. भाजपने राहुल गांधी यांची प्रतिमा खराब केली असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचे नेत्तृत्व करण्यास राहुल गांधी सक्षम असल्याचं सांगत देशातील जनता त्यांना पंतप्रधान बनवेल असे राऊत म्हणाले. ( Rahul Gandhi will become Prime Minister – Sanjay Raut ) उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी मिठी मारली?

राहुल गांधी नेहमी मला प्रेमानेच भेटतात. गुरूवारपासून ते माझी वाट बघत होते. यात्रेत लोक खूप उत्साहाने सहभागी होत आहेत. आम्ही १२ किमी एकत्र चाललो. जम्मूतले शिवसैनिकही या ठिकाणी चालले. बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणाही त्यांनी दिल्या. ५० खोके एकदम ओके या घोषणाही दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणावर आमच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते महाराष्ट्राला सांगणं म्हणजे नवा वाद निर्माण करणं होईल. काय चर्चा झाली ते मी आत्ता सांगणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंचीही चौकशी केली.

शिवसेना बदलतेय का? सावरकर वादानंतर राहुल गांधींसोबत संजय राऊत

महाराष्ट्रात  भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात होते. त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवले आहेत. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची. ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे आरोप राहुल गांधी यांनी केले होते. यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. पण त्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत सावरकरांच्या पत्राचे पुरावे दिले.

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मतभेद व्यक्त केले होते. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे बोलले त्याच्याशी ते सहमत नाहीत, ते म्हणाले, “राहुल गांधी जे बोलले आहेत त्याच्याशी आम्ही सहमत नाही. राहुल गांधी जे बोलले ते चुकीचे आहे. सावरकरांबद्दल आपल्या मनात अपार प्रेम आणि आदर आहे. लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते मिटवता येणार नाही.”

महत्वाच्या बातम्या: