Bhaskar Jadhav | “जानकर आणि खोतकरांचं भाजपमध्ये जे झालं तेच शिंदेंचं होणार”; भास्कर जाधवांच्या दाव्याने खळबळ

Bhaskar Jadhav | रत्नागिरी : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला. सेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरुच आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाची जोरदार खिल्ली उडवली आहे.

“महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांचे काय झाले? या दोन नेत्यांच भाजपच्या युतीत स्थान काय? असा सवाल करतानाच जानकर आणि खोतकर यांचं जे झालं तेच शिंदे गटाचं होईल. शिंदे गटाचाही वापर होईल”, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी शिंदे गटाबाबत खळबळ दावा केल्याने राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे.

“12 आमदार यांची मुदत केव्हा संपली? पण अजून निवडणूक नाही. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कायम ठेवावे. निवडणूक आयोगाने स्वायत्ता राखवी. निवडणूक आयोग सध्या स्वायत्ता राखून काम करत नाही”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

“भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय झाले? शिंदे गटाचाही वापर होणार. भाजप त्यांनाही सोडणार नाही, असं सांगतानाच दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असणार आहे. हे मी ठरवलं आहे. उद्या दापोलीत ठाकरे गटाचा आमदार निवडून आलेला दिसेल”, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला आहे.

“आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का? याबाबत ते अंदाज घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे कुणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे. भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. देशात छोटे पक्ष शिल्लक न ठेवण्याचं काम भाजप करत आहे”, असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.