Eknath Shinde | “१ रुपये मानधनात काम करायला तयार पण शिंदे साहेब, मुलाला आमदार करा”; आईची आर्त हाक

Eknath Shinde | बीड : राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील एका महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलेलं एक पत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

पत्रासोबतच या महिलेने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा मुलगा श्रीकांत याला आमदार करण्याची मागणी केली आहे.

सागरबाई विष्णू गदळे असं या महिलेचं नाव असून त्या बीड जिल्ह्यातील दहीफळ गावच्या रहिवासी आहेत. “माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो १ रुपया प्रतिमहिना मानधनावर काम करायला तयार आहे”, अशी हाक या आईनं मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

दि. १८/०१/२०२३ –
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणास पत्र लिहिण्याचे कारण – माझ्या श्रीकांत ला आमदार करा – (बाबत)
मी सागरबाई विष्णू गदळे आपणास विनंती करते की, माझा श्रीकांत गदळे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो १ रुपया प्रतिमहिना मानधनावर काम करायला तयार आहे. माझ्या श्रीकांतला आमदार घेऊन राज्यातील शेतकरी, आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे.
एवढेच नाही तर, महाराष्ट्रातील गरिबी हटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून गरिबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हे काम माझ्या श्रीकांतला करायचे आहेत.
त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब तुम्ही माझ्या श्रीकांतला आमदार करा व राज्यातील शेतकरी व गोरगरिबांची सेवा करण्याची संधी द्या.
जर आपण माझ्या श्रीकांतला हि संधी दिली तर मी आपली खूप आभारी राहील आणि नक्कीच माझा श्रीकांत आपण दिलेल्या आमदारकी चा योग्य वापर करून राज्यातील जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा पूर्णतः करणार आहे.

आपली विश्वासू,
सागरबाई विष्णू गदळे.
रा. दहीफळ (वड) ता. केज जि. बीड

या महिलेनं दिलेल्या हाकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.