Pankaja Munde | बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षात नाराज असल्याच्या जोरदार चर्चेला चांगलाच जोर आलेला. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडूनही पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. शिवसेनेच्या नेत्यांकडून त्याबाबत वक्तव्येही केली जात होती. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि पंकजा मुंडेंचा एक व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बीडमधील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर माईकसमोर चंद्रशेखर बावनकुळे थांबलेले आहेत. तिथे पंकजा मुंडे या त्यांना 2 मिनिटे बोलू द्या अशी विनंती करताना दिसत आहेत. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंना बोलण्याची संधी दिली नाही. याउलट पंकजा मुंडेंना नाही नाही म्हणत बोलण्यास नकार दिला. त्यावर पंकजा मुंडे या खाली बसल्या. या व्हायरल व्हीडिओवरुन भाजपमध्ये पंकजा मुंडेंना नाकरले जात असल्याचे बोलले जात आहे.
गोपिनाथ मुंडेमुळे २०१४ साली भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली हे सत्य हे कुणी नाकारू शकत नाही.
मात्र परिस्थिती अशी आली आहे की पंकजा मुंडेंना भाजपच्या स्टेजवर साधे बोलू दिले जात नाही आणि ताई मी भाजपमध्येच असल्याचे गर्वाने सांगतात. pic.twitter.com/XHGJfm3GlA— Pratik S Patil (@Liberal_India1) January 21, 2023
‘गोपिनाथ मुंडेमुळे 2014 साली भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली हे सत्य हे कुणी नाकारू शकत नाही. मात्र परिस्थिती अशी आली आहे की पंकजा मुंडेंना भाजपच्या स्टेजवर साधे बोलू दिले जात नाही आणि ताई मी भाजपमध्येच असल्याचे गर्वाने सांगतात’, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंचा अपमान केला नसून “पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता. पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता. कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला असे समजणे हे हस्यास्पद आहे” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव केल्याचे पाहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bhaskar Jadhav | “जानकर आणि खोतकरांचं भाजपमध्ये जे झालं तेच शिंदेंचं होणार”; भास्कर जाधवांच्या दाव्याने खळबळ
- Eknath Shinde | “१ रुपये मानधनात काम करायला तयार पण शिंदे साहेब, मुलाला आमदार करा”; आईची आर्त हाक
- Chandrashekhar Bawankule | “प्रकल्प बाहेर जात असताना काय करत होते?”; बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर टीका
- Eknath Shinde | “त्यांच्या तोंडी नेहमी साखर”; एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव
- Sanjay Raut | “त्यांच्यावर सरकारचा दबाव म्हणून निकालाला वेळ”; निवडणूक आयोगावरच्या निर्णयावरुन राऊतांचा गंभीर आरोप