BJP | “पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट”; भाजप नेत्याच्या कबुलीने खळबळ

BJP | मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षात नाराज असल्याच्या जोरदार चर्चेला चांगलाच जोर आलेला. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडूनही पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. आता मात्र स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत मोठं विधान केले आहे.

“भाजपमध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिले. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

बीडमधील सभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी (21जानेवारी) माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. विनंती करूनही पंकजा मुंडेंना भाजपच्या स्टेजवर बोलू दिले नाही. पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर धरला आहे.

काय आहे व्हायरल व्हीडिओ?

बीडमधील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर माईकसमोर चंद्रशेखर बावनकुळे थांबलेले आहेत. तिथे पंकजा मुंडे या त्यांना 2 मिनिटे बोलू द्या अशी विनंती करताना दिसत आहेत. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंना बोलण्याची संधी दिली नाही. याउलट पंकजा मुंडेंना नाही नाही म्हणत बोलण्यास नकार दिला. त्यावर पंकजा मुंडे या खाली बसल्या. या व्हायरल व्हीडिओवरुन भाजपमध्ये पंकजा मुंडेंना नाकरले जात असल्याचे बोलले जात आहे.

‘गोपिनाथ मुंडेमुळे 2014 साली भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली हे सत्य हे कुणी नाकारू शकत नाही. मात्र परिस्थिती अशी आली आहे की पंकजा मुंडेंना भाजपच्या स्टेजवर साधे बोलू दिले जात नाही आणि ताई मी भाजपमध्येच असल्याचे गर्वाने सांगतात’, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बानकुळेंची सारवासारव

“पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता. पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता. कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला असे समजणे हे हस्यास्पद आहे” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव केल्याचे पाहायला मिळाले आहे.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबतच्या वावड्या सातत्याने उठत असतात. मात्र, त्यामागे कोण आहे? असा सवाल सर्वांनाच भेडसावत असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनीच त्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात मोठी एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.