Share

Santosh Bangar | “शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; संतोष बांगर म्हणातात….

🕒 1 min read Santosh Bangar | मुंबई : शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात मोठा वाद सुरु आहे. हा वाद सध्या कायदेशीरित्या लढाई सुरू आहे. याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी दोन्ही गटांच्या दाव्यावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने … Read more

Published On: 

🕒 1 min read

Santosh Bangar | मुंबई : शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात मोठा वाद सुरु आहे. हा वाद सध्या कायदेशीरित्या लढाई सुरू आहे. याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी दोन्ही गटांच्या दाव्यावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने याबाबतच्या सुनावणीला ३० जानेवारीची तारीख दिली आहे.

या दरम्यान २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आहे. त्यामुळे या पदावर आता एकनाथ शिंदे बसणार की उद्धव ठाकरे कायम राहणार हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. यावरच आता शिंदे गटातील नेते संतोष बांगर यांनी भाष्य केले आहे.

“आम्हाला एकनाथ शिंदे हेच शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावर पाहायला आवडतील. शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची निवड केली जाणार आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल,” असे संतोष बांगर म्हणाले आहेत”, असे संतोष बांगर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

India Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या