Shivsena | मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात मोठा वाद सुरु आहे. हा वाद सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी दोन्ही गटांच्या दाव्यावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने याबाबतच्या सुनावणीला 30 जानेवारीची तारीख दिली आहे.
“शिवसेना संपवण्याची सुपारी खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वावादाची ही शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आहे”, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.
“संजय राऊतांना जर न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास नसेल, न्यायालयाच्या निर्णयावर विलंब होत असल्याचा ठपका ठेवत असतील तर ठाकरे गटाकडून वकिलांची फौज न्यायालयात का उभा केली जात आहे?” असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.
“उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवसापासून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, तेव्हापासून संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला धनुष्यबाणाबाबत न्यायालय निकाल का देणार आहे हे माहिती असल्यामुळेच त्यांनी शिंदे गटावर टीका करत आहेत”, असेही नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
“कोणताही पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्षाची मान्यता असो ही लोकप्रतिनिधींच्या बहुमतावरच अवलंबून असते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाच्या धनुष्यबाणावर शिंदे गटाचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला मान्यता आहे. त्यामुळे आमच्या शिंदे गटाकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निकाला ठाकरे गटाला माहिती असल्यामुळेच त्यांच्याकडून निकालाबाबत दुटप्पीपणाची भूमिका मांडली जात आहे”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
“सध्या खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या गळ्यात गळे घालून ही यात्रा केली आहे. पण यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटले असेल?” असा सवालही यावेळी म्हस्के यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; “आमच्या पक्षाकडून…”
- Santosh Bangar | “शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; संतोष बांगर म्हणातात….
- Bhaskar Jadhav | “निवडणूक आयोग स्वायत्त, यावर आमचा विश्वास नाही”; शिवसेनेचा गंभीर आरोप
- Pankaja Munde | विनंती करूनही पंकजा मुंडेंना भाजपच्या स्टेजवर बोलू दिले नाही; मुंडे समर्थकांत नाराजीचा सूर
- Bhaskar Jadhav | “जानकर आणि खोतकरांचं भाजपमध्ये जे झालं तेच शिंदेंचं होणार”; भास्कर जाधवांच्या दाव्याने खळबळ