Share

Weather Update | ऐन थंडीत ‘या’ ठिकाणी बरसणार पावसाच्या सरी, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडी (Cold) चा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या (Rain) सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडी (Cold) चा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या (Rain) सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. याचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे चित्र समोर आले आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. अशात हवामान खात्याकडून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. अशात उत्तर भारतीयांसाठी हवामान खात्याने दिलासा देणारी माहिती दिली आहे. उत्तर भारतामध्ये 22 जानेवारीनंतर म्हणजेच आजपासून हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 ते 25 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांची मदत घेत आहे. वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये देखील घट दिसून आली आहे. अशात लवकरच कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर देशासह राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही