IND vs NZ | “तुमच्याकडे कितीही अनुभव असला तरी…” ; वसीम जाफर यांचा विराट-रोहितला मोलाचा सल्ला

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 घडी राखून पराभव केला. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने 2-0 विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (24 जानेवारी) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) ने टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघाला लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.

सध्या टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडसोबत टी-20 सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. 9 फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकली, तर भारतीय संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे.

टीम इंडिया 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा म्हणजेच अंतिम एकदिवसीय सामना खेळणार आहे. तसेच त्याच दिवशी रणजी ट्रॉफीचे पुढचे सामने खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा सराव करायचा असेल, तर त्यांनी न्यूझीलंडविरुद्धचा सामना सोडून रणजी क्रिकेट खेळावे, असा सल्ला वसीम जाफर यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना वसीम जाफर म्हणाले, “माझ्या मते, रणजी ट्रॉफी खेळणे अर्थपूर्ण आहे. तुम्ही कितीही अनुभवी असला तरी तुम्हाला सामन्यापूर्वी सरावाची गरज असते. विशेषता कसोटी क्रिकेट खेळण्याआधी तुम्हाला व्यवस्थित सराव करावा लागतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका सर्व दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. कारण या मालिकेमध्ये विजय मिळवून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकतो. विराट कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि संघातील इतर वरिष्ठ खेळाडूंचीही तीच अवस्था आहे.”

महत्वाच्या बातम्या