Gauva Seed | औषधी गुणधर्मांचा स्त्रोत आहे पेरूच्या बिया, करतात ‘या’ आरोग्याच्या समस्या दूर

Gauva Seed | टीम महाराष्ट्र देशा: पेरू एक अतिशय चविष्ट फळ आहे. हिवाळ्यामध्ये अनेकांना हे फळ खायला आवडते. पेरूमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. हे घटक त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पेरूमध्ये मऊ आणि रसाळ लहान बिया असतात. या बिया बहुतेक लोकांना खायला आवडत नाही, म्हणून ते त्या फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का? या बियांमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. हे घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्वे आढळून येतात. त्यामुळे पेरूच्या बियांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. पेरूचे फळ खाताना तुम्ही त्याच्या बिया चावून खाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही या बिया बारीक करून पेरूचा रसाच्या स्वरूपात पिऊ शकतात. पेरूच्या बियाचे आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

पचन संस्था निरोगी राहते

पेरूच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पेरूच्या बियांचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. पेरूच्या बिया थेट गिळल्याने ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

वजन कमी करण्यास मदत होते

पेरूच्या बियांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पेरूमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अजिबात आढळून येत नाही. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे पेरूच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील कार्बोहायड्रेट्स कमी होतात. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. पेरूच्या बियांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

उच्च रक्तदाबांच्या रुग्णांसाठी पेरूच्या बिया खूप फायदेशीर ठरू शकतात. या बियांमध्ये पोटॅशियम आढळून येते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. पेरूच्या बिया खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि उच्च रक्तदाब यांची समस्या देखील दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या