Raj Thackeray | राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची युती होणार? भेटीमुळे चर्चांना उधाण

Raj Thackeray | मुंबई: गेल्या एका वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर राजकारणात कधी काय घडेल? याचा अंदाज लावणं कठीणच नाही तर अशक्य झालं आहे.

अशात राज्याच्या राजकारणात नवीन भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यांच्या या भेटीचे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट अर्थ लावले जात आहे.

Raj Thackeray met Eknath Shinde

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? हे सांगणं आता कठीण झालं आहे.

अशात राज ठाकरे  ( Raj Thackeray ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहे.

त्यांच्या या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  ( Raj Thackeray ) यांची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे  ( Raj Thackeray ) यांच्या सातत्याने भेटीगाठी होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे  ( Raj Thackeray ) मराठा पाट्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिला आहे. परंतु, तरी देखील अनेक दुकान आणि आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या दिसत नाही.

यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावरून मनसेने पुणे आणि नाशिकमध्ये तीव्र आंदोलन केलं आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानावर असलेल्या इंग्रजी पाट्या फोडल्या.

तर नाशिकमध्ये मनसेने दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळ फासत जोरदार घोषणाबाजी केली. मराठी पाट्या दिसल्या नाही तर तोंडाला काळ फासू अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे  ( Raj Thackeray ) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.