Ajit Pawar | मराठा आंदोलनाचा अजित पवारांना पुन्हा एकदा फटका? केला छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील दिसून आले आहे.

अशात मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्याला जाणार होते.

त्यांच्या या दौऱ्याला मराठा कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर अजित पवार  ( Ajit Pawar ) यांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे.

यापूर्वी मराठा आंदोलनावरून अजित पवारांनी  ( Ajit Pawar ) बारामती दौरा रद्द केला होता. अशात अजित पवारांना दुसऱ्यांना मराठा आंदोलनाचा फटका बसला असल्याच्या चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar has canceled this tour

आज उपमुख्यमंत्री अजित पवार  ( Ajit Pawar ) हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे 43 व्या मराठा साहित्य संमेलनाचं उद्घाटन अजित पवार  ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते होणार होतं.

परंतु, अजित पवारांनी हा दौरा रद्द केला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाने केलेल्या विरोधामुळे अजित पवारांनी  ( Ajit Pawar ) हा दौरा रद्द केला असल्याच्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं,  यासाठी मनोज जरांगे  ( Ajit Pawar ) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन हळूहळू संपूर्ण राज्यात पसरलं. या आंदोलनामुळे अजित पवारांनी  ( Ajit Pawar ) यापूर्वी बारामती दौरा रद्द केला होता.

तर आज याच पार्श्वभूमीवर अजित पवार  ( Ajit Pawar ) छत्रपती संभाजीनगरमध्ये आले नसल्याचं बोललं जात आहे. कारण ज्या मराठा आंदोलकांनी अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध केला होता, त्यांना पोलिसांनी अटक केली.

महत्वाच्या बातम्या